मल्टीस्टेटमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत करा.! ठेवीदारांचे रॅली काढून आंदोलन... प्रशासनाला इशारा

मल्टीस्टेटमध्ये अडकलेले पैसे ठेवीदारांना तात्काळ परत करा.! ठेवीदारांचे रॅली काढून आंदोलन... प्रशासनाला इशारा

NEWS15 रिपोर्ट - बीड (गेवराई)

बीड जिल्ह्यातल्या अनेक मल्टीस्टेट बँक आणि संस्थांमध्ये हजारो ठेवीदारांचे करोडो रुपयांच्या घरात पैसे अडकले आहेत. तर ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील घोटाळा समोर आल्यानंतर नागरिकांचा अशा संस्थांवरील विश्वासाचं उडाला आहे. त्यातच कुटे जोडप्याला अटक झाल्यानंतर अनेकांचा आशा मावळल्या असून, आता जिल्ह्यात अशा पतसंस्था आणि बँका विरोधात ठेवीदार मोर्चे काढू लागले आहेत.

अशीच मागणी घेऊन, आज (शुक्रवार 5 जुलै) रोजी ठेवीदार आणि खातेदार संघर्ष समितीनं हलगी बजाओ आंदोलन केलं असून, बीड जिल्ह्यातल्या गेवराईत हे आंदोलन करण्यात आले आहे. या प्रकरणात 19 तारखेपर्यंत कारवाई न झाल्यास थेट गोदावरीच्या पात्रात जलसामधी घेण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाला आंदोलकांनी दिला आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गेवराई पोलीस स्टेशनपर्यंत रॅली काढत आणि हालगी वाजवत हे आंदोलन करण्यात आले. तर यामधे बहुतांश खातेदार शेतकरी असून, या शेतकऱ्यांना आपल्याच कष्टाच्या पैशासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे.

बीड जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट, जिजाऊ मल्टीस्टेट, लक्ष्मी माता अर्बन आणि मराठवाडा अर्बन या मल्टीस्टेटमध्ये हजारो ठेवीदारांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून या सर्व मल्टीस्टेटल कुलूप लागले आहे. त्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी यात अडकून पडल्या आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे.

'ठेवीदारांना / खातेदारांना बिना माय बापाच्या लेकरांसारख या त्या कार्यालयात फिरण्याची वेळ आली आहे. कुणाचे शिक्षण.! तर कुणाचे लग्न, दवाखाने पैसे नसल्याने बाकी आहेत. मात्र यांना कोणी वालीच नसल्याचे दिसून येतंय.

तर या सर्व मल्टीस्टेटच्या संचालकांना वाचवण्याचे काम प्रशासन करीत असल्याचा आरोप करीत, ठेवीदारांनी आत्महत्या केल्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही का? असा प्रश्न केला आहे. तसेच 19 जुलैपर्यंत मल्टीस्टेट प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही, त्यांची मालमत्ता जप्त झाली नाही तर थेट गोदावरीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल.! असा इशारा या आंदोलकांच्या नेत्या पूजा मोरे यांनी दिला आहे.