एव्हीएम हटाव, देश बचाओचा नारा देत, भंडाऱ्यात स्वाक्षरी मोहीम...

एव्हीएम हटाव, देश बचाओचा नारा देत, भंडाऱ्यात स्वाक्षरी मोहीम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, भंडार

देशभरात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. मात्र यात मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याने, ईव्हीएम हटाव देश बचावचाचा नारा देत; भंडाऱ्यात काल दि.19 जानेवारीला महाधरणे आंदोलन करण्यात आले.

ईव्हीएम हटवून बैलेट पेपरवर मतदान घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

संविधान समितीच्या संघर्ष नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता. तर सर्वपक्षीय नेत्यांची स्वाक्षरी मोहीम यावेळी राबवण्यात आली. या मोहिमेला सर्वपक्षीय नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.