राहुल गांधी यांच्या आरक्षण संदर्भातील वक्तव्याचा; भाजपा उमरखेड यांच्यावतीने निषेध व्यक्त

राहुल गांधी यांच्या आरक्षण संदर्भातील वक्तव्याचा; भाजपा उमरखेड यांच्यावतीने निषेध व्यक्त

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

कॉग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षण विषयात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात; आज सकाळी साडेनऊ वाजता उमरखेड शहरातील माहेश्वरी चौक येथे.! भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुका व शहर भाजपाच्यावतीने काँग्रेसच्या ध्येय धोरणा विरोधात तीव्र घोषणा देण्यात आल्या... भाजपा पुसद व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व आमदार नामदेव ससाने यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेस आरक्षण विरोधी असून, नेहरू पासून ते गांधीपर्यंत काँग्रेस आरक्षणाविरोधी असल्याचे बॅनर घेऊन; मतासाठी काँग्रेसने नेहमीच भारतीय जनता पार्टी मुस्लिम विरोधी असल्याचे बोलत असतात.! परंतु, काँग्रेसच मुख्य आरक्षण  विरोधी असल्याचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व आमदार नामदेव ससाने यांनी आपल्या प्रतीक्रियेतून व्यक्त केले आहे.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार, किसनराव वानखेडे, अतुल खंदारे, धनंजय व्यवहारे, संतोष भाऊ माहेश्वरी, सुधाकर लोमटे सर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.