वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज - थोरात
![वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज - थोरात](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66e5a0868756c.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
शुद्ध हवा,ऑक्सिजन व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडा शिवाय पर्याय नाही.वृक्ष आपल्याला फक्त पाने,फुलेच देत नाहीत,तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात नवी आशा व उमेद देतात.म्हणूनच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मंडळ अधिकारी थोरात यांनी केले.
दिङोरी तालूक्यातील आशेवाडी (रामशेज) येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व गोदरेज अँग्रोवेट यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या पाणी कारभारी प्रकल्पातंर्गत,वॉटरशेड ऑर्गनाझेशन विभागीय प्रमुख बीबीशन उघडे नवनाथ पाचारणे, गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली,
एकाच वेळी तीन हजार वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी थोरात बोलत होते.
यावेळी वॉटरशेड ऑर्गनाझेशन ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी नवनाथ पाचारणे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की,पर्यावरण संतुलित राहण्यासाठी, झाडे लावणे आणि ती जगवणे हे राष्ट्रीय कर्तव्यच मानले पाहिजे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरिकाचा मनापासून सहभाग आवश्यक असून,या उपक्रमात येथील शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहिजे असे पाचारणे यांनी मनोगतात व्यक्त केले.
यावेळी मंडळ अधिकारी थोरात, मंडळ कृषी अधीकारी पी.बी. गोल्हाईत, प्रतीक्षा पाटील रेखा सूर्यवंशी, सविता कराड, दामोदर देशमुख, किरण गुंबाडे, सुभाष पाटील,दिनेश पगार,राजेंद्र आहिरे, कैलास अहिरे , हरिश्चंदर मोरडे आदीसह रामशेज माध्यमिक विद्यालयाचे शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग नोंदवला.यावेळी आशेवाडी सरपंच साहेबराव माळेकर, उपसरपंच संजय बोडके,माजी उपसरपंच संदिप कापसे, खतवड येथील सरपंच बबन दोबाडे, उपसरपंच सुकदेव खुर्दळ, हरिसिंग माळेकर, तळेगाव दिंङोरी येथील सरपंच सोनाली चारोस्कर, अजय चारोस्कर,पवार,सदस्य दशरथ बोडके,कैलास सानप, प्रकल्पातंर्गत असणारी गावातील,सरपंच उपसरपंच,सदस्य ,ग्रामसेवक,पाणी कारभारी मंडळ सदस्य,वसुंधरा सेवक व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंङोरी विभागीय कार्यालयीन टीम वसुंधरा सेवकांनी विशेष परिश्रम घेतले.