कुरकुम-रावणगाव पोलीस चौकी फक्त नावलाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात...

कुरकुम-रावणगाव पोलीस चौकी फक्त नावलाच का साहेब? अवैध व्यवसाय जोरात...

प्रतिनिधी - परशुराम निखळे 

रावणगाव (पुणे) : कुरकुम रावणगाव पोलीस चौकी नावालाच असून, काम मात्र ० असल्याचे दिसत आहे. त्यामुळं दौंड तालुक्यातील कुरकुम, मळद, रावणगाव, खडकी परिसरात मटक्याचा पुन्हा एकदा सुळसुळाट झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायीकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, आपली मटका यांची दुकाने जोमात थाटली आहेत. पुणे-सोलापूर हायवेवरती कुरकुम येथे पोलीस चौकी शेजारीच पोलीसांचा मदतीने बाजारतळा जवळच असला व्यवसाय चालू आहे. तर रावणगाव चौकी समोर खडकी येथे रोडटच आपली दुकाने थाटली आहेत. यामुळ अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

तर कुरकुम-रावणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुलेआम चालू असल्याने; कुरकुम पोलीस कुठे बिजी आहेत का अशी चर्चा जोरदार चालू आहे. रावणगाव कुरकुम पोलिसांचे काम संशयास्पद असून, बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा. विशेष म्हणजे पोलीस खात्याला हे अवैध धंदेवाले जुमानतसुद्धा नसल्याचे बोलले जात आहे. तर कोण पोलिस आमचे काही करू शकत नाही, आमी पोलीसांना महिन्याला हप्ते देतो; असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. ह्या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना जवळ करून, पोलीसांच्या मदतीने व्यवसाय थाटला आहे की काय? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.

हे असे असेल तर पोलीस प्रशासनाने मात्र वेळीच यांना लगाम न घातल्यास, याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेला आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार हे मात्र निश्चित. पोलीसांकडून या धंदेवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी महिन्याला हप्ते वसुली केली जाते; अशी नागरीकामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. तर याविषयी चौकीला तक्रार करणेस गेले की, दौंडला जावा आसे सांगण्यात येथे.!

मग कुरकुम आंणि रावणगाव चौक्या काय हप्ते गोळा करण्यासाठी आहेत का? असा सवाल नागरिक करत आहेत. हा बेकायदा मटका, अवैधधंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून, त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे बोलले जात आहे. कुरकुम आणि रावणगाव चौकीने मटका, दारू, जुगार असे व्यवसाय करणाऱ्या कीती लोकांवर 2023 गुन्हे दाखल केले. कुरकुम एमआयडीसी तर रोजच काहि आपघात झालेला नसला तरी पोलीसांची खाजगी इडिका कार दिसत आसते; सारके कंपनीत जाऊन नको त्याची चौकशी चालू असते; रावणगाव पोलीस चौकीपासुन 5 किमी अंतरावर आसलेल्या खडकी गाव अवैद्य धंदाचा विळखात मटका दारू झुगार असे आनेक धंदे खडकीत चालू आहेत. सरास हाॅटेलवरती विना परवाना दारू विकली जाते. रोडवरच  सगळी वाहाणे उभी केली जातात. कित्येक वेळातरी आपघात झाले आहेत. तरी देखील रावणगाव चौकीचे पोलीस हे पाहुन सुद्धा न पाहिले सारखे करत असतात; कुठे रेड होनार आसेल तर ते आधीच कळवतात? दौंड कुरकुम रावणगाव चौकीने  कुरकुम रावणगाव खडकी कीती अवैद्य धंदे वाले यांचावर कारवाई केली PI साहेब तुम्हीच सांगा.! अवैद्य धंदे वालेना पाटीसी घालत आहे का? कोणत्या नेते मंडळी याचा गुन्हे दाखल करू नका आसे दबाव आहे का अशी नागरीकान मध्ये जोरदार चर्चा चालू आहे.

चौकट...

कुरकुम चौकीत बघावं तेव्हा अवैद्य धंदे करणारी लोक कायम तिथे ठिया माडून बसलेली असतात; रावणगाव चौकीत पण तीच बोंब चालू आहे. अवैद्य धंदेवालेणीच चौकी चालवाय घेतलीय का काय? रावणगाव चौकीचे बाथरूम मागे तर आक्षरस बियर आणि दारूचे मोकळा बाटलयाचे ठिगचे ठिग साठलेत.