तब्बल 9 वर्षानंतर घेतला राकावासीयांनी शंकर पट्टाचा आनंद...

तब्बल 9 वर्षानंतर घेतला राकावासीयांनी शंकर पट्टाचा आनंद...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

सडक-अर्जुनी तालुक्यातील राका येथे बैंलाच्या शंकरपट्टाच आयोजन दि. १८ जानेवारी ते १९ जानेवारी २०२४ असे 2 दिवसीय पट्टाचा आयोजन करण्यात आले होते.

यात प्रथम क्रमांक येणाऱ्या जोडीला  २१,००० रुपये, दुसरा क्रमांक १७,००० आणि तिसरा क्रमांक १३,००० असा बक्षीस होते.

या स्पर्धेत एकूण ४७ बैल मालकांनी सहभाग घेतला होता. तर यातील पहिल्या क्रमांकाचे बक्षीस वडेगाव या गावाला गेले. हा पट यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत राका, राका गावकरी मधु भाऊ दोनोडे, शंकर मेंढे, कैलास रामटेके, सुधीर शिवणकर, शिवा पडोळे, मुन्नालाल पंचभाई आदी मेहनत घेतली.