बनावट अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्या कंत्राटदार विरुध्द फसवणुकीचा गुन्हा...

बनावट अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्या कंत्राटदार विरुध्द फसवणुकीचा गुन्हा...

NEWS15 प्रतिनिधी - नारायण काळे

हिंगोली : जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेची नीविदा मिळवण्यासाठी बनावट अनुभव प्रमाणपत्र देणाऱ्या कंत्राटदार विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमनुरी नगरपालीका मार्फत नळ पाणीपुरवठा योजनेची कामे केले असल्याचा अनुभव प्रमाणपत्र; मुख्याधिकारीची स्वाक्षरी व शिक्का त्यावर खोटे जावक क्रमांक टाकून, निविदा भरतेवेळी प्रमाणपत्र दाखल केले. याप्रकरणी स्वच्छता पाणीपुरवठा अभियंता नंदकिशोर डाखोरे यांच्या फिर्यादीवरुन, औढानागनाथ तालुक्यातील पुर येथील सोहम कन्स्ट्रक्शचे मालक बालाजी वानखेडे विरुध्द कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.