ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे सडक_अर्जुनी नगरीत जोरदार स्वागत...

ओबीसी जनगणना संकल्प यात्रेचे सडक_अर्जुनी नगरीत जोरदार स्वागत...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, गोंदिया

ओबीसी जनगणना संकल्प यात्रेची सुरुवात; दि. ३ फेब्रुवारी पासून सेवाग्राम (वर्धा) इथून ओबीसी युवा अधिकार मंचच्यावतीने करण्यात आली आहे.  ही यात्रा काल दि. ७ फेब्रुवारी रोजी सडक/अर्जुनी नगरीत पोहोचली आहे.

यावेळी या यात्रेचा स्वागत करण्यासाठी ओबीसी कृती समिती अध्यक्ष दिनेश हुकरे, मधु भाऊ दोनोडे, माधव तरोणे, अशोक लंजे तसेच तालुक्यातील ईतर सर्व ओबीसी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी या यात्रेसोबत ओबीसी युवा अधिकार मंच संयोजक उमेश कोराम, गोंदिया चे संयोजक खेमेद्र कटरे इतर मान्यवर उपस्थित होते. ही यात्रा सडक अर्जुनी मध्ये आली असता या यात्रेचा जोरात स्वागत करून ही पायदळ चालत असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, उठ ओबीसी जागा हो संघर्षांचा धागा हो, जो ओबीसी की बात करेगा वही देश मे राज करेगा अश्या घोषणा देण्यात आल्या.