शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चा धडकला...
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर रुमणे मोर्चा धडकला...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66b1fa5d343fd.jpg)
प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा यासह इतर मागण्यासाठी रुमणे मोर्चा काढण्यात आला. नांदेडच्या मुदखेड तहसीलवर हा मोर्चा धडकला.
युवक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, पीक विम्याचे पैसे जमा करण्यात यावे, शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीजपुरवठा देण्यात यावा यास इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेस पक्षासह शेतकरी हातात रुमने घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख, कैलास गोडसे श्रावण, रापणवाड बी आर कदम, शेतकरी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.