आयसीटीसी कोर्समध्ये भामरे यांना पारितोषिक, तालुक्यातील शिक्षकांकडून कौतुक...
![आयसीटीसी कोर्समध्ये भामरे यांना पारितोषिक, तालुक्यातील शिक्षकांकडून कौतुक...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64b694a854044.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील पालखेड जि. प. प्राथमीक शाळेत कार्यरत असलेल्या श्रीमती भारती भांबरे यांनी जिल्हा परिषद नाशिक, अमाझॉन फ्युचर इंजिनिअर व एलएफई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्ह्यात माहे एप्रिल महिन्यात झालेल्या आयसीटीसी कोर्समध्ये घवघवीत यश मिळवून, पारितोषिक मिळवल्याने तालुक्यातील शिक्षकांनी त्यांचे कौतुक केले आहे. जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
याप्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल गौतम, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, डायटचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. शिवाजी औटी, समग्र शिक्षाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुनील दराडे, प्रवीण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
नाशिक जिल्हापरिषदेच्यावतीने जिल्ह्यातील शिक्षकांसाठी इन्ट्रोडक्शन टू कॅम्पुशनल थिंकिंग अँड कोडींग हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील ११८४ शिक्षकांनी नोंदणी केली. त्यापैकी ५२३ शिक्षकांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यापैकी टॉप ७० शिक्षकांची पारितोषिकसाठी निवड करण्यात आली.
यामध्ये दिंडोरी तालुक्यातील शिक्षकांनी प्रथम, व्दितीय व त्यासह एकूण१०शिक्षक विजेते ठरले. यामध्ये पालखेड जि. प. प्राथमीक शाळेचे शिक्षिका भारती भांबरे यांनी या कोर्समध्ये घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्यांना मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉप व सीएस किट देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी नम्रता जगताप, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत गवळी, सुनीता आहिरे, वंदना चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.