निलंगा नगरपरिषदच्या अनागोंदी कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा
निलंगा युवक काँग्रेस तालुका व शहर काँग्रेसच्यावतीने निलंगा नगरपरिषदच्या अनागोंदी कारभारा विरोधात; निलंगा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल सोनकांबळे, तालुकाध्यक्ष मदन बिरादार, शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वाखाली दि. 9 ऑक्टोबर रोजी विविध मागण्यासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सध्याची पाणीटंचाई दूर करण्यासाठी शहरातील बंद केलेले विधन विहीरी तात्काळ चालू करावे, शहरात असलेले पथदिवे चालू करावे, शहरातील जुन्या गावामधील रस्ते - नाले यांचे कामे सुरू करून, सध्या डेंग्यूची साथ असल्याने त्यासाठी फवारणी करावी अशा विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अभय साळुंके, तालुकाध्यक्ष विजय पाटील, डॉ. सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरविंद भातंबरे, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रा. दयानंद चोपणे, काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.