महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन...
![महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे एकदिवसीय धरणे आंदोलन...](https://news15marathi.com/uploads/images/202311/image_750x_655c2ef9a2fe9.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक अर्जुनी (गोंदिया)
पंचायत समिती सडक अर्जुनी येथे विविध मागण्यासंदर्भात; महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कर्मचारी संघटनेच्यावतीने दि. 20 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन समिती आवारात करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक कर्मचारी यांच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे...
1. यावलकर समितीच्या शिफारशीनुसार संगणक परिचालक यांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे. 2. संगणक परिचालक यांना सुधारित आकृती बंधनुसार कर्मचारी दर्जा आणि किमान वेतन मिळेपर्यंत 20000 रू मानधन मिळणे. 3. जॉब सीकुरीटी मिळने. 4. महिला प्रशुती रजा मिळणे; अश्या मागणीचे निवेदन शासनाला पाठविण्यात आले.
या वेळी धरणे आंदोलनाला पंचायत समिती सभापती संगीता खोब्रागडे, उपसभापती शालींदरजी कापगते, सदस्य शिवाजी गहाने, तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष मधुसूदनजी दोनोडे, चरणदास शहारे यांनी भेट देऊन समस्या सोडविण्याची शासन दरबारी मदत करू असे सांगितले. आंदोलन यशस्वितेसाठी संघटनेचे पदाधिकारी व तालुक्यातील सर्व संगणक परिचालक यानी सहकार्य केले.