पैसे न मिळाल्याने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात, आंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न.! अधिकारि मात्र खुर्चीवर निवांत बसून...

पैसे न मिळाल्याने जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात, आंगावर पेट्रोल टाकून शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न.! अधिकारि मात्र खुर्चीवर निवांत बसून...

NEWS15 प्रतिनिधी - आकाश वालदे 

गोंदिया : शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्रावर रब्बी हंगामाचे धान्य विक्री करूनही पैसे न मिळाल्याने; गोंदिया जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे, यांच्या दालनात एका शेतकऱ्याने स्वतःच्या आंगावर पेट्रोल टाकून आत्महत्या करण्याचा केला प्रयत्न केला आहे. मात्र इतर शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हा अनुचित प्रकार थांबविण्यात आला असून, सदर घटणा घडत असताना देखील जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे हे आपल्या खुर्ची वरून उठले नाही आणि हा सगळा प्रकार एखादा मनोरंजनाचा खेळ असल्यागत पाहत राहिले. मात्र इतर शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हा अनुचित प्रकार थांबविण्यात आल्यानं पुढील अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया तालुक्या अंतर्गत येणाऱ्या चुटिया गावातील श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्थेत; चुटिया सह परिसरातील इतर काही गावातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात धान्य विक्री केल होत. मात्र आज महिना लोटला असला तरी.! शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. तर दुसरी कडे श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्थेकडे रब्बी हंगामात खरेदी केलेला धान्य गोदामात उपलब्ध नसल्याने, जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धान्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी अनेकदा जिल्हा पणन अधिकारी यांना पत्र व्यवहार केला मात्र आज पैसे जमा होतील उद्या पैसे जमा होतील चार दिवसात पैसे देतो असा टालमटोल शेतकऱ्यांना सोबत केला जात असल्याने, लोधीटोला गावातील दीपक कंनसरे नामक शेतकऱ्याने स्वतःच्या बॅग मध्ये आणलेला पेट्रोल अंगावर टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मात्र खुर्चीवर बसलेले जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे, हे खुर्ची वरून उठले नाही तर दुरीकडे सोबत आलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तर दुसरीकडे श्रीराम अभिनव धान्य खरेदी संस्थेने खरेदी केलेला धान्य चार दिवसात आपली संपत्ती विक्री करून जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाला धान्य उपलब्ध करून देत असल्याचे लेटर हेड वर लिहून दिले. त्यामुळे येत्या चार दिवसात पैसे मिळाले नाही तर आणखी मोठा आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हा पणन अधिकाऱ्याला दिला आहे.