औराद शहाजानीला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी, गावकऱ्यांनी काढला मोर्चा...
![औराद शहाजानीला तालुक्याचा दर्जा मिळावा यासाठी, गावकऱ्यांनी काढला मोर्चा...](https://news15marathi.com/uploads/images/202308/image_750x_64cc74e4bbbad.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी
लातूर : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हा नुतन तालुका करावा या मागणीसाठी; ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकऱ्यांनी स्वयं स्वयंस्फूर्तपणे वाजत गाजत मोर्चा काढून, निलंगा येथे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात असलेल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे गाव तालुका झालाच पाहीजे यासाठी नागरीकांनी, व्यापारी तसेच शेतकरी यांनी ग्रामपंचायत कार्यालय येथून घाेषणा देत; बालाजी मंदिर मुख्य बाजारपेठेतुन बसस्थानक मार्गे छञपती शिवाजी महाराज चाैकापर्यंत हा मोर्चा पुढे निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांना तालुक्याचे मागणी चे निवेदन देण्यात आले.
यावेळी बालाजी भंडारे, राजाप्पा थेटे, अमोल ढोरसिंगे, भरत बियाणी, हाजी सराफ, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, डाँ. अरविंद भातांब्रे , दयानंद चोपणे यांच्यासह औराद, तगरखेडा, माने जवळगा, होसूर, हालसी (तु.), शेळगी, सावरी आदींसह जिल्हा परिषद सर्कल मधील नागरीक, शेतकरी व व्यापारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.