कळमनुरी.! अवैध दारुबंदीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यात ठिय्या; धानोरा जहगिर येथील महिला आक्रमक
प्रतिनिधी : नारायण काळे
हिंगोली : अवैध दारु व अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी; हिंगोलीतील धानोरा जहगीर येथील महिलांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत आंदोलन केले आहे. मागील एक वर्षापासून अवैध देशी दारुची सर्रासपणे व उघडपणे विक्री होत असल्याने, अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तर शाळकरी मुलाचे भविष्यही धोक्यात येत आहे.
वेळोवेळी पोलीस प्रशासन अवैध दारु विक्री रोखण्यात अपयश येत आहे. तसेच दारु बंदी अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, गावातील अवैध दारु विक्री त्वरित बंद करावी अन्यथा.! तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महिला व ग्रामस्थांनी दिला आहे.