अगोदर आमचा मोबदला व परतावा दया, मगच कामे सुरु करा, खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील शेतकरी आक्रमक...!
News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड
चाकण : औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक पाचमध्ये कंपन्याना औद्योगिक महामंडळ यांच्याकडून जे भूखंड वाटप करण्यात आले आहेत. पण जो पर्यंत आम्हाला जमिनीचा १५ टक्के विकसित परतावा मिळत नाही, घरांचे व झाडांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन होत नाही तो पर्यंत कोणत्याही कंपनीला आम्ही कामे सुरु करू देणार नसल्याचा इशारा औद्योगिक वसाहतीतील गोनवडी गावातील बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीतील गोनवडी गावातील मोठे क्षेत्र चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचसाठी संपादित झाले आहे. त्या बदली शेतकऱ्यांना जो चालू बाजारभावा प्रमाणे परतावा मिळावा. तसेच आमचे भुसंपादन हे २०१७ ला झाले पण आमच्या जमिनीला बाजारभाव २०१५ प्रमाणे काढला आहे यामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तो बाजारभावही आत्ताच्या मूल्यांकणाप्रमाणे मिळायला हवा अशी आग्रही मागणीही गोनवडी गावातील बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी काही शेतकऱ्यांनी असेही सांगितले की, आमच्या बरोबर संपादित केलेल्या इतर मोठ्या इन्व्हेस्टर यांना औद्योगिक वसाहत महामंडळाने परतावे दिले पण आम्ही सर्वसामान्य शेतकरी असल्याने आम्हाला अजूनही परतावे दिले नाही. यामुळे शेतकरी जास्तच आक्रमक होऊन त्या ठिकाणी काम सुरु करण्यासाठी आलेल्या कंपनी प्रशासनाला शेतकऱ्यांनी सुका दम भरला. यावर हतबल होऊन कंपनी प्रशासनाने आम्ही तुमचा प्रश्न सुटत नाही तो पर्यंत आम्ही काम सुरु करणार नाही असे तोंडी आश्वासन दिले.

यावेळी उपस्थित तरुणांनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरले की, आमच्या बापाने आमच्या भागाचा विकास होईल, आमच्या पोरांना नोकऱ्या लागतील, कामधंदा मिळेल म्हणून औद्योगिक वसाहतीला जमिनी दिल्या. पण तीन वर्षे उलटून गेले पण आमच्या तोंडाला फक्त पाने पुसली आहेत असाही आरोप उपस्थित तरुणांनी केला. यावेळी अगोदर काम सुरु करुद्या अन नंतर उदघाटन तरी करुद्या अशी विनवणी करणाऱ्या एका राजकीय वारसदारसही स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
याप्रसंगी संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक दिनेश मोहिते, बाळासाहेब मोहिते, तबाजी मोहिते, बबन मोहिते, धनंजय तनपुरे, दशरथ काळे, संजय शेजवळ, रामदास काळे, दत्तात्रय मोहिते, संतोष मोहिते, किरण मोहिते, योगेश काळे, मंगेश काळे यांच्यासह इतर स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया :
जो पर्यंत औद्योगिक महामंडळ आमच्या मागण्यापूर्णतःवास नेत नाही तो पर्यंत एकाही कंपनीला या ठिकाणी काम करून देणार नाही. त्याचं बरोबर यापुढे कंपन्यानी काम करताना स्थानिक तरुणांना विचारात घेऊनच काम करावे अन्यथा मोठा संघर्ष झाल्याशिवाय राहणार नाही.
-दिनेश मोहिते, संचालक, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना..