सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी देण्याची मागणी....!

सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी देण्याची मागणी....!

News15 मराठी प्रतिनिधी सुधीर शिवणकर 

गोंदिया : मागील काही दिवसापूर्वी शासनाने सेवानिवृत शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याचा निर्णय निर्गमीत केला आहे तो निर्णय चुकीचा आहे. सदर निर्णय रद्द करून सुशिक्षित पात्रताधारकांना सेवेची संधी देण्याबाबतचे निवेदन शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटना तालुका सडक अर्जुनीच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना १८ जुलै २०२३ रोजी पाठविण्यात आले आहे.

सध्या बी.ए, एम.ए शैक्षणिक पदवी व डी.एड, बी.एड, एम. एड, पी.एच.डी. व्यावसायिक पदवी असलेले सुशिक्षित पात्रताधारक नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या सुशिक्षित तरुण बेरोजगारांची संख्या वाढत असून पालक व समाजाकरिता ही चिंतेची बाब झाली आहे. यावर शासनाने उपाय न काढता सेवानिवृत्त शिक्षकांना कमी करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्यामुळे बेरोजगारिची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या शासन निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे.

सदर निर्णय रद्द करून सुशिक्षित पात्रता धारकांना सेवेची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात निवेदन मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार प्रेरणा कटरे यांना देण्यात आले. यावेळी निवेदन देतांना शासकीय व निमशासकीय सेवानिवृत संघटनेचे भाऊराव यावलकर, आर.व्ही.मेश्राम, मदनलाल चूऱ्हे, दिलीप राऊत, एम. यू. गहाणे, व्ही. एस. गजभिये, हिरालाल राऊत, डॉ. पी.पी.मारगाये, के.पी. उपरीकर आदी उपस्थित होते.