कळवण.! मोकभणगी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार...

तालुक्यातील मोकभणगी येथील सोपान दादाजी पवार यांच्या शेत शिवारातील घराजवळ मध्यरात्रीच्या ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास बिबट्याच्या थरार सी.सी.टी.व्ही. कँमेरात कैद झाला आहे.

कळवण.! मोकभणगी शिवारात बिबट्याचा मुक्त संचार...

प्रतिनिधी : दिपक झाल्टे

कळवण : तालुक्यातील मोकभणगी येथील सोपान दादाजी पवार यांच्या शेत शिवारातील घराजवळ मध्यरात्रीच्या ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास बिबट्याच्या थरार सी.सी.टी.व्ही. कँमेरात कैद झाला आहे. या बिबट्यांचा परिसरात पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

कळवण तालुक्यातील विविध भागात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु आहे. शेत शिवारात शेतकर्‍यांना दिवसा बिबट्यांचे दर्शन होत आहे. त्यामुळे शेत मजूर कामास येण्यास टाळाटाळ करीत आहेत. ऐन शेतीच्या हंगामात कामे पडून आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्यांना रात्री अपरात्री घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. गेल्या तीन दिवसापूर्वी मोकभणगी गावालगत शशिकांत बाबुराव पवार यांचे राहते घराजवळील तार कंपाउंड मध्ये बिबट्याने उडी मारून, तीन बकर्‍या फस्त केल्या होत्या. हि घटना ताजी असताना दि. २९ सप्टेंबर’च्या पहाटे ३.२० मिनिटांनी मोकभणगी येथील शेतकरी सोपान दादाजी पवार यांचे शेत शिवारातील घराजवळ बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला आहे. यावेळी तो कुत्र्यांचा पाठलाग करतांना दिसून आला आहे. याचे चित्र पवार यांचे घराबाहेर बसविण्यात आलेल्या सी सी टी व्ही मध्ये कैद झाले आहे. या बिबट्याचा परिसरात पिंजरा लावून तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे