सावरगाव येथे गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षकांचा गौरव
तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेतील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या; १८ विद्यार्थ्यांसह प्रशालेतील २७ शिक्षकांचा सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

प्रतिनिधी : दादासाहेब काडगावकर
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव जिल्हा परिषद प्रशालेतील एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या; १८ विद्यार्थ्यांसह प्रशालेतील २७ शिक्षकांचा सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्यावतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
याप्रसंगी गट शिक्षणाधिकारी जाधव, माजी जि.प. सदस्य राजकुमार पाटील, सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, शंकर शिंदे, सुधीर मगर, रमेश चौगुले, शालेय समिती अध्यक्ष राम पाटील, अमोल काळदाते अतुल पवार प्रा.कानिफनाथ माळी, सुधीर मगर, मुख्याध्यापक संदीप वाघ यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.