महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दावडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न...!

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दावडी येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

खेड(राजगुरूनगर) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने दावडी येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील एसएससी परीक्षा मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये गणित विषयांमध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळून प्रथम आलेल्या कुमारी मांजरे तनिषा संतोष हिचा तसेच विद्यालयात प्रथम पाच गुणवंत विद्यार्थी कुमार मांजरे तनिषा संतोष ९४.६०%, कुमार खेसे वेदांत संजय ९३.६०%, कुमार अमराळे साई संजय ८८.६०%, कुमार दुंडे शिवतेज साहेबराव ८८ %, कुमारी शिंदे साक्षी बळवंत ८७.८०% या सर्वांचा पत्रकार संघटनेच्या वतीने पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला खेड तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष सम्राट राऊत, उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड, सचिव अँड. प्रितम शिंदे, ज्येष्ठ पत्रकार कल्पेश भोई, मनोहर गोरगल्ले, प्रभात पत्रकार सुनील बटवाल, आशिष ढगे पाटील, नितीन सैद, लहू लांडे, सचिन आल्हाट, अजय जगनाडे, प्रशांत भामरे, अर्चना हजारे, योगगुरु पत्रकार बापूसाहेब सोनवणे, चंद्रकांत भालेकर, रत्नेश वैरागी व इतर पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश दगडू डुंबरे तसेच या कार्यक्रमाला प्राचार्य केंगारे ए जे, के.जे. दिघे स्कूल कमिटी सदस्य,खोमणे डी.जे क्लार्क, श्रीमती. मांजरे सुप्रिया क्लार्क, कराळे पी.डी सेवक, दाभाडे आर.व्ही सेवक, साबळे सेवक, श्रीमती. बेडेकर एफ.व्ही तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष पी.माळी यांनी केले.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या कुमारी मांजरे मनीषा संतोष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्राचार्य केंगरे सर तसेच पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संग्राम राऊत यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश डुंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम येण्याचा मान आपल्या शाळेला मिळाला असून हा मान मिळण्यासाठी शाळेचे प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद तसेच या मुलीचे पालक यांचा फार मोठं योगदान असून भविष्यामध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी बारावीमध्ये प्रथम येऊन भविष्यात क्लासवन अधिकारी होऊन आपल्या गावाचा, आपल्या शाळेचा नावलौकिक वाढवावा अशी आशा व्यक्त केली.