सामाजिक : खराबवाडी गावातील सारा सिटी मधील सी-११ मध्ये दत्त जयंती उत्सव संपन्न..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी मधील सी-११ सोसायटीमध्ये दत्त जयंती उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

सारा सिटी सी फेजमधील भाविकांनी व इतरही भाविकांनी या दत्त जयंती उत्सवात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवली. यावेळी या दत्त जयंती उत्सवाचे सोसायटी मधील प्रमुख मान्यवरांनी आयोजन केले होते. या उत्सवात दत्त महाराज यांची आरती,भजन पार पडल्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यात एकूण सोसायटी व परिसरातून दीड हजाराच्या वरती भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी या उत्सवासाठी ज्ञानोबा खाडे,विजयकुमार अर्जून,रुपेश मोरे,चंद्रकांत शिंदे मामा, राजेंद्र मोलावडे,सुशांत परब,विशाल धर्माधिकारी,चंद्रकांत भेरे,सुनील सिंग,सुहास भाकरे,शंकर जाधव,रमेश परिट, रमेश पुजारी,रमेश पवार,नावकार साहेब आदी.आयोजकांनी उत्तम नियोजन करून उत्सव पार पाडला. यावेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.