देशमुख कुटुंबाने केली ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड...

देशमुख कुटुंबाने केली ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिवाळी तोंडावर आली की ऊस तोड कामगारांची ऊस तोडणी ला जाण्याची लगबग असते तर दिवाळी तच हंगाम सुरू होत उस तोड कामगारांच्या नशिबी भल्या पहाटे थंडीत ऊस तोड करून कारखान्यावर पोहचविण्याची लगबग असते.कसले वसु बारस अन कासेला पाडवा,लक्ष्मीपूजन अन भाऊबीज त्यांचे नशिबी कष्टच मात्र या कष्ट कऱ्यांची दिवाळी लखमापूर येथील देशमुख ऊस बागायतदार गोड करत वेगळा आदर्श निर्माण करत आहे.

 लखमापूर येथील निखिल नंदकुमार देशमुख हे गेल्या सहा वर्षांपासून ऊस तोड कामगार यांचे सोबत दिवाळी साजरी करत असून यंदाही त्यांचे देशमुख ऍग्रो फॉर्मवर गाय वासरूची पूजा करत ऊस तोड कामगारांना फराळ वाटप करत त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.

वसुबारस च्या शुभ मुुर्तावर देशमुख एग्रो फार्म,लखमापूर येथे कादवा साखर कारखान्याचे  नियोजनातून २०२३-२४ या गळीत हंगामाची ऊस तोड प्रारंभ करण्यात आला,या निमित्ताने ऊस तोडीस आलेल्या कष्टकरी माय-बाप, माता भगिनी,बाल-गोपाळ,आणि आमचे सहकारी यांचे ऋण व्यक्त करत त्यांना,जिवणाआवश्यक धान्य तांदूळ, डाळ,चहा,साखर,लहान मुलांना खाऊ उबदार कपडे इ.यांचे वाटप करण्यात आले.यंदा त्यांचा मुलगा मनविर याचा प्रथम वाढदिवस ऊस तोड कामगारांचे मुलासोबत साजरा करण्यात आला.देशमुख कुटुंबीय गेली सहा वर्ष हा उपक्रम राबवत असून ऊस तोड कामगार या प्रेमाने भारावून गेले.