पिंपरी चिंचवड शहरा चिखली परिसरातील कॅफे बनले; अल्पवयीन मुला-मुलींच्या अय्याशीचे आड्डे.! पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत?

News15 प्रतिनिधी : गणेश मोरे
चिखली : पिंपरी चिंचवड शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्यास व अत्याचार करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी शहरातील काही कॅफे कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक कॅफे हे अल्पवयीन मुला-मुलींच्या अय्याशीचे अड्डे बनत चालले आहेत. कॅफेच्या नावाखाली ७० ते १०० रुपये घेऊन एक तास बसण्यासाठी काही कॅफेधारकांनी पडदे लावून कॅफेमध्ये स्वतंत्र बसण्यासाठी कॅबिन बनवून आपली आय्याशीची दुकानदारी या कॅफे वाल्यानी मांडलेली आहे. या कॅफेमध्ये सर्रास अल्पवयीन मुले-मुली येत असतात. या कॅफेवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे मात्र पोलिसांकडून अशी कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. चिखली पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर कॅफे असताना देखील पोलिसांचे या उघडपणे चालणाऱ्या अय्याशिकडे दुर्लक्ष का ? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश असताना असे अवैध कॅफे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र जेव्हा पासून कृष्ण प्रकाश यांची तडका फडकी बदली झाली आणि कॅफे धारकांनी आपली अनधिकृत पणे दुकानदारी पुन्हा चालू केली आहे. आता या कॅफे अय्याशिकडे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे "अंकुश" ठेवणार का? असा प्रश्न आता स्थानिक चिखलीकर विचारू लागले आहे.
प्रतिक्रिया..
कॅफेच्या नावाखाली अल्पवयीन मुला-मुलींना चुकीच्या मार्गाला लावणारे कॅफे बंद झाले पाहिजेत. पोलिसांनी या अशा अवैध कॅफेनवर कारवाई केली पाहिजे. मात्र चिखली पोलीस यावर कारवाई करत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे लवकरच लेखी तक्रार देणार असल्याचे स्थानिक शांताराम खुडे यांनी सांगितले.
-शांताराम खुडे, स्थानिक नागरिक