सामाजिक : खेड तालुक्याचे युवा नेते अक्षय जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन..!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्याचे युवा नेते तसेच अश्वमेघ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अक्षय जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते.

अक्षय जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बहुळ येथील अभयदादा साबळे पाटील युवा मंचच्यावतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यात मोठ्या संख्येने तरुणांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला होता.

अक्षय जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाथ आश्रमातील मुलांना फळे वाटून साजरा करण्यात आला. त्याच बरोबर तालुक्यातील विविध गावात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अक्षय जाधव यांचा वाढदिवसाच्या विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
यावेळी युवा सेना प्रमुख श्री. धनंजय बाप्पू पठारे, पै. अनिल अण्णा साबळे, शक्तीबाप्पू साबळे विष्णू बापू थिटे, विशाल आप्पा पोतले, अतुल वाडेकर, संदीप डोंबाळे, पै.विकी साबळे, गणेश साबळे प्रणव वाडेकर पंकज खलाटे व पै. अभयदादा साबळे पाटील युवा मंच सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि समस्त बहुळ गावातील सर्व ग्रामस्थ आणि युवा मित्र परिवार बहुसंख्येने उपस्थित होता.