आमचा अधिकार नाही का? कळस बु ग्रामपंचायतने आम्हांला सोडले वाऱ्यावर - राम महाराज वाकचौरे
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील अकोले : सध्या राज्यात कोरोंना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने १४ एप्रिल पर्येंत लॉकडाऊन जाहीर केला असल्याने त्याचा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच सरकारने राज्यातील जे दिव्यांग व्यक्ती असतील त्यांना मदत म्हणून सर्व ग्रामपंचायत प्रशासनाला आदेश दिले आहेत की, दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या थेट घरी जाऊन त्यांना धान्य किंवा किराणा आदी तस्संम वस्तूचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने बहुतेक ग्रामपंचायतिनी यासर्व वस्तूचे वाटप केले आहे पण त्यात अकोले तालुक्यातील कळस बु ग्रामपंचायत अपवाद ठरली आहे. गावातील फक्त पाच कुटुंबातील व्यक्तींनाच या वस्तू वाटल्या आहेत. मग बाकीचे उर्वरित दिव्यांग यांनी काय करायचे ? त्या वस्तूवर आमचा अधिकार नाही का? आम्ही उपाशी मरायचे का? अशी आर्त हाक कळस बु गावातील दिव्यांग राम महाराज वाकचौरे यांनी दिली आहे. राज्यात एवढी मोठी महामारी चालू आहे आणि कळस बु ग्रामपंचायत आमच्या हक्काच्या वस्तू मध्येही राजकारण करत असेल तर आमच्या हक्कासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल. ग्रामपंचायत कळस बु कोणत्यानं कोणत्या कारणाने कायम चर्चेत असते. आणि या अगोदरही कळस बु ग्रामपंचायत कडून राम महाराज वाकचौरे यांच्यावर खूप वेळा अन्याय झाल्याचे त्यांनी सांगितले. आम्हांला दोन दिवसांत आमच्या हक्काच्या वस्तू मिळाव्यात अशा मागणीचे पत्र आमचे तालुक्याचे नेते अमर मुरूमकर यांच्या माध्यमातून तालुका गट विकास अधिकारी यांना वाढदिवसाच्यादेण्यात येणार आहे. प्रतिक्रिया:- अकोले तालुक्यातील कोणत्याही दिव्यांग व्यक्तीवर शासनाने आदेश देऊनही अन्याय होत असेल तर अशा आणीबाणीच्या काळात सर्व दिव्यांग बांधव रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. मी अकोले तालुका गट विकास अधिकारी यांच्या बरोबर बोलणे झाले आहे. त्यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. तरी अशा तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत कडून दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.. - अमर मुरूमकर, अकोले तालुका दिव्यांग सेल प्रमुख