पाण्याच्या डबक्यात पडlलेल्या कोल्ह्याला नागरिकांकडून जीवदान.!
![पाण्याच्या डबक्यात पडlलेल्या कोल्ह्याला नागरिकांकडून जीवदान.!](https://news15marathi.com/uploads/images/202301/image_750x_63c3a562e572d.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पालखेड मोहाडी रस्त्याच्या मध्यावर काल सायंकाळी रस्त्याने जात असताना; अज्ञात मोटरसायकलस्वारणे कोल्ह्याला धडक दिल्याने, कोल्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याच्या एका डबक्यात पडला. त्यामुळे रात्रभर हा कोल्हा थंडीमध्ये ओरडत होता. रात्रभर थंडीत कुडकुडत असणाऱ्या कोल्ह्याला सकाळी येथील वस्तीवर राहत असलेल्या कामगार मजुरांनी धाव घेऊन, त्याला डबक्यातून बाहेर काढून शेकोटीची उब देत त्याला जिवदान दिले.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी सकाळी रस्त्याने जात असताना; या कोल्ह्याची अवस्था बघून वनाधिकारी अशोक काळे व वैभव गायकवाड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला व काळे यांनी संबंधित वनकर्मचाऱ्यांना सूचना केल्यानंतर त्यांनी कोल्ह्याचा बचाव करून, नाशिक येथे इको रुग्णालयात दाखल केले. यावेळी वनविभागाचे वनरक्षक योगेश दळवी चेतन गवळी, विशाल पवार प्रीतम चारोस्कर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.