अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावातील उमाजी बंगाळ नामक व्यक्ती बेपत्ता..!
![अकोले तालुक्यातील मेहंदुरी गावातील उमाजी बंगाळ नामक व्यक्ती बेपत्ता..!](https://news15marathi.com/uploads/images/202405/image_750x_664cd97ef3d71.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
अकोले : मेहंदुरी गावातील उमाजी किसन बंगाळ(वय-५७ वर्षे) नामक व्यक्ती २१ मे २०२४ पासून राहत्या घरातून मध्यरात्री २:३० वाजता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेच्या बाबत उमाजी बंगाळ यांचा मुलगा सुशील उमाजी बंगाळ याने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादित दिलेल्या वर्णनानुसार बेपत्ता व्यक्तीची अंदाजे उंची ५ फूट, रंगाने सावळे, नाक-लांब, चेहरा-गोल उभट, केस - पांढरे बारीक, शर्ट सफेद रंगाचा, तपकीरी रंगाची पॅन्ट, पायात काळ्या रंगाची चप्पल, डोक्याला पाठीमागे जखम असल्याच्या वर्णनाचा व्यक्ती आपल्या कुणाला आढळून आल्यास अकोले पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
बेपत्ता झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात कुणाला काही माहिती मिळाल्यास अकोले पोलीस ठाणे तसेच पुढील मोबाईल नंबरवरती संपर्क करावा. संपर्क : 9763029845