सामाजिक : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांच्याकडून महाळुंगे गावात महिलासाठी मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन..!

सामाजिक : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषदेचे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांच्याकडून महाळुंगे गावात महिलासाठी मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषदेसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार संदीप शंकरराव सोमवंशी यांच्याकडून महिला भगिनींसाठी मनोरंजन पर “होम मिनिस्टर” कार्यक्रमाचे शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता,महाळुंगे इंगळे गावात आयोजन करण्यात आले आहे.

संदीप सोमवंशी यांनी जिल्हा परिषदेसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यांनी या अगोदर खराबवाडी गावातही होम मिनिस्टर कार्यक्रम, महाळुंगे इंगळे गावात स्वरमई संध्या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यांच्या कार्यक्रमाची अनेक इच्छुक उमेदवार यांनी पुनरावृत्ती केली होती. संदीप सोमवंशी यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी करून उद्याचा कार्यक्रम गटातील राजकीय वातावरण बदलेल असे नियोजन केले आहे.

संदीप सोमवंशी यांचा राजकीय संबंध बघता उद्याच्या त्यांच्या कार्यक्रमाला विविध पक्षाचे पदाधिकारी हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मागे या गटातील सर्वच गावातील मतदार व प्रमुख नेते असल्याने त्यांचे या गटात चांगले वातावरण असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीसाठी खास रंजक खेळ,लकी ड्रो आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला जिल्हा परिषद गटातील सर्व महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आव्हान आयोजन संदीप सोमवंशी व खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती क्रांती सोमवंशी यांनी केले आहे.