पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे यांना मातृशोक...!
![पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक जनार्दन दांडगे यांना मातृशोक...!](https://news15marathi.com/uploads/images/202501/image_750x_679070b902c79.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
लोणी काळभोर : पुणे प्राईम न्यूजचे मुख्य संपादक व प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे कार्याध्यक्ष जनार्दन गोवर्धन दांडगे यांच्या मातोश्री केशरबाई दांडगे (वय-७५ वर्षे) यांचे मंगळवारी (ता.२१) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. गोवर्धन इंडस्ट्रीजचे संचालक लक्ष्मण दांडगे यांच्या त्या मातोश्री, तर ॲड.आकांक्षा दांडगे यांच्या त्या आजी होत्या.
दरम्यान, केशरबाई दांडगे यांच्या निधनाने लोणी काळभोर सहपरिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर लोणी काळभोर (ता.हवेली) येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज बुधवारी (ता.२२) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.