गावकऱ्यानो जागे व्हा, गायरान क्षेत्रावरील अतिक्रमने निघणारच, एकजूट होऊन पर्याय शोधा...!

गावकऱ्यानो जागे व्हा, गायरान क्षेत्रावरील अतिक्रमने निघणारच, एकजूट होऊन पर्याय शोधा...!
गावकऱ्यानो जागे व्हा, गायरान क्षेत्रावरील अतिक्रमने निघणारच, एकजूट होऊन पर्याय शोधा...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : सध्या राज्यातील सर्व गायरान क्षेत्रातील अतिक्रमने काढण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिल्याने ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमीत नागरिकांचे धाबे दनाणले आहेत.

गायरान क्षेत्रावरील अतिक्रमने मोकळी केली जाणार हे खूप दिवसापासून सुरु होते. याकडे ग्रामस्थानी दुर्लक्ष केले होते. पण हिच चर्चा आता उच्च न्यायालयाच्या आदेशात परावर्तित झाल्याने गायरान क्षेत्रातील अतिक्रमने केलेल्या नागरिकांचे धाबे दनाणले आहेत. यात विशेष बाब म्हणजे गायरान क्षेत्रातील अतिक्रण पाडण्याचा खर्चही अतिक्रमन केलेल्या व्यक्तीकडूनच वसूल करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहे. त्यामुळे डोक्यावरील छत्र पण जाणार आणि जमवलेली जमा पुंजी पण जाणार असल्याचे चित्र आता नागरिकांच्या समोर उभे राहिले आहे.

खेड तालुक्याचा विचार करता चाकण औद्योगिक वसाहतीमधील गावाना अतिक्रमने हटवण्याचा मोठा फटका बसू शकतो. यातील खराबवाडी, येलवाडी या गावात जास्त गायरान अतिक्रमीत क्षेत्र आहे. त्यात विशेष म्हणजे खराबवाडी गावात गावठाणा लगत गायरान असल्याने जशी लोकसंख्या वाढत गेली तसे निवासी प्रयोजनासाठी गायरान क्षेत्रावर अतिक्रमणे वाढत गेली आहेत. त्यात खराबवाडी गावातील तब्बल १८४ मिळकती गायरान क्षेत्रात येत असल्याने अनेक गरीब नागरिकांचे संसार यामुळे उघड्यावर येणार आहेत. खराबवाडी गावातील गायरान क्षेत्रावर अनेक मागासवर्गीय लोक राहतात ते रोजच्या रोजी रोटीसाठी कामाला गेल्यानंतरच त्यांच्या घरची चूल पेटते आणि त्याच नागरिकांच्यावर अशी वाईट वेळ आली तर त्याचा आपण विचार करू शकत नाही अशीच काहीशी परिस्थिती आता गावात निर्माण झाली आहे. काही नागरिकांनी लाखोचे कर्ज काढून मोठी बांधकामे उभी केली आहेत. त्यांच्या या बांधकामांवर जर हातोडा चालला तर त्यांच्यावरही मोठी आर्थिक कुऱ्हाड येणार आहे. यातून अनेक कुटूंब उद्धवस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. यात नागरिकांचीही तितकीच चूक असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. पण जे मागे झाले ते सोडून आता गावा गावातील नागरिकांनी एकत्र येऊन या उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागायला हवी. नाहीतर एकमेकावर अवलंबुन राहून स्वतःचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ही वेळ वेगळी आहे सर्व गायरान अतिक्रमीत क्षेत्राचा इथं:बूत अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर झालेला आहे. अन त्याच अहवालाच्या अनुषंगाने गायरान क्षेत्रावरील अतिक्रमने काढण्याचा निर्णय झाला आहे. तरी आता गावकऱ्यांनी जागे होऊन एकजूट दाखवायला हवी नाहीतर मनातील संकोचीतपणामुळे भविष्यातील पिढ्याचे मोठे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही.