टुनकी येथे श्री हनुमान जन्मोत्सव दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न...

NEWS15 प्रतिनिधी : भास्कर बोंद्रे
बुलढाणा : संग्रामपूर तालुक्यतील टूनकी येथे विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व श्रीराम दल ग्रृप टुनकी यांच्या संयुक्त विद्यमानाने.! गुरुवार रोजी हनुमान जन्मोत्सव दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टुनकी गावातील व तालुक्यातील बजरंगी भक्तांनी तसेच तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन या रक्तदान शिबिर कार्यक्रमात हजर राहून आपले अमुल्य असे रक्तदान केले. यावेळी जवळपास 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
सदर रक्तदानाचे कार्यक्रमाला बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अमोल अंधारे तसेच बजरंग दल जिल्हा गोरक्षा सहसंयोजक भारत बावस्कर, विश्व हिंदू परिषद प्रखंड सहमंत्री श्रीकृष्णा भाऊ घायल, बजरंग दल ता. विद्यार्थी सहसंयोजक ऋषी कोकाटे, बजरंगी पवन माळवंदे, निलेश बद्रीया, शुभम मुदोळकार खामगांव यांनी सदिच्छा भेट दिली. तर सुरेश लोणकर, गजानन निंबोळकार, बजरंग दल तालुका गोरक्षा प्रमुख सागर वावरे आणि बजरंग दल तालुका सहसंयोजक प्रवीण सपकाळ यांनी प्रभू श्रीराम व मारुतीराया यांच्या प्रतिमेचे पूजन करून, रक्तदान शिबिराला सुरुवात केली. हे रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सागर वावरे, प्रवीण सपकाळ, सागर लोणकर, सूरजसिंग भाटीया, राजू लोणकर, चिरंजीव झालटे, ज्ञानेश्वर बाजारे, अक्षय चांदुरकार, जितेंद्र इंगळे, सचिन कोष्टी, मगण माळी व समस्त बजरंग दल कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.! कार्यक्रमास टूनकी येथील गावकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.