खराबवाडी गावातील सातव कुटुंबाकडून गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न..!

खराबवाडी गावातील सातव कुटुंबाकडून गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न..!

News15 मराठी प्रतिनिधी विश्वनाथ केसवड 

चाकण : खराबवाडी गावातील माऊली सातव व त्यांच्या सुविद्य पत्नी सुशीला सातव यांच्याकडून गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजण करण्यात आले होते.

सालाबादप्रमाणे याही वर्षी सातव कुटूंबाकडून याही वर्षीही नित्याची महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व भाविक भक्तांना खराबवाडी गावातील सातव इस्टेट याठिकाणी साई मंदिरात आग्रहाचे निमंत्रण देऊन गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यात आला. सातव परिवार श्रध्येने दर वर्षी हा उत्सव साजरा करत असतो.