एकतानगर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य नगरसेवक रणजितशेठ जरे यांच्या पुढाकाराचे चाकण उत्तर पोलिसांकडून कौतुक
प्रतिनिधी : विश्वनाथ केसवड चाकण,
चाकण : एकतानगर परिसरात चोरीच्या घटना तसेच अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. चाकण नगरपरिषदेचे नगरसेवक रणजितशेठ सखाराम जरे यांच्या पुढाकारातून एकतानगर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
एकतानगर चौक हा वर्दळीचा परिसर असल्याने येथे नागरिकांची मोठी ये-जा असते. या परिसरात चोरीच्या घटना तसेच अपघात घडत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे चौकात सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आल्याने परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.
चोरीच्या घटनांमध्ये संशयितांचा शोध घेणे, वाहनांची ये-जा तपासणे तसेच अपघातांच्या घटनांमध्ये महत्त्वाचे पुरावे मिळविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिस प्रशासनासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमामुळे परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चाकण उत्तर पोलिसांकडून आभार
एकतानगर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल चाकण उत्तर पोलिसांकडून नगरसेवक रणजितशेठ सखाराम जरे यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी लोकप्रतिनिधी आणि पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
नागरिकांची सुरक्षितता हीच प्राथमिकता ठेवून नगरसेवक रणजितशेठ जरे यांनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच स्तुत्य असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून एकतानगर परिसर अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, एकतानगर परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत नगरसेवक रणजितशेठ जरे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
vishwanathkeswad