वृक्षप्रेमी शिंदे यांच्याकडून मदतीचा हात, वृक्ष संगोपनासाठी साहित्य भेट...

वृक्षप्रेमी शिंदे यांच्याकडून मदतीचा हात, वृक्ष संगोपनासाठी साहित्य भेट...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण नाशिक

दिंडोरी : गेल्या सहा वर्षापासून स्वराज्य संवर्धन बहुउद्देशीय संस्थेने अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले त्यामध्ये न्याहारी डोंगर परिसर, खंडोबा डोंगर, कोराटे सबस्टेशन, अहिवंतगड या ठिकाणी वृक्षारोपण केले आहे. या संगोपनाची जबाबदारी संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब चव्हाणके व त्यांचे सहकारी करत असतात वर्षभर सुरू असलेल्या या कार्यात साधनसामग्रीची नेहमी गरज भासत असते; त्यावेळेस परिसरातील पर्यावरणप्रेमी नागरिक नेहमी मदतीला धावून येत असतात.

याच अनुषंगाने उन्हाळ्यामध्ये  झाडांना पाणी देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती.हे चित्र नेहमी कोराटे येथील द्राक्षतज्ञ मधुकर शिंदे हे नेहमी बघत होते संस्थेचे सहकारी व पर्यावरण प्रेमी असल्याकारणाने ते नेहमीच पर्यावरण पूरक कार्याशी नाळ जोडून ठेवत विचारपूस करत असतात काम करताना होणारी मोटार पंप स्टार्टर त्यासाठी लागणारा पाईप इतर जोडणीच्या वस्तू असे १५००० रुपये किमतीचे साहित्य आणि संस्थेकडे सुपूर्द केले यावेळी संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब चव्हाणके यांनी शिंदे यांचे आभार मानले. याप्रसंगी जयराम शिंदे,अंबादास कदम,सागर कदम,संतोष कदम गणेश कदम,दत्तू कदम,अरुण मालसाने रुद्राक्ष चव्हाणके,आदी उपस्थित होते.