सावता परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल बिरदवडे यांची निवड...!
![सावता परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी विठ्ठल बिरदवडे यांची निवड...!](https://news15marathi.com/uploads/images/202303/image_750x_6412d09bf1d08.jpg)
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खराबवाडी गावचे जेष्ठ कार्यकर्ते तथा भैरवनाथ सहकारी सोसायटी खराबवाडीचे विद्यमान संचालक विठ्ठल बिरदवडे यांची सावता परिषद पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विठ्ठल बिरदवडे यांनी चाकण व खराबवाडी शहरातील सावता माळी वधू-वर सूचक मंडळातही संचालक म्हणूनही काम करत आहेत. विठ्ठल बिरदवडे यांची निवड सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली सावता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष गोरख भुजबळ यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे पत्र दिले.
विठ्ठल बिरदवडे यांच्या निवडीबद्दल सावता परिषद प्रदेश महासचिव गणेश साहेबराव दळवी यांनी त्यांचे अभिनंदन केले.