खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेजमध्ये महाशिवरात्री उत्सव संपन्न..

खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेजमध्ये महाशिवरात्री उत्सव संपन्न..

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खराबवाडी गावातील सारा सिटी डी फेजमध्ये महिला भगिनींच्या माध्यमातून महाशिवरात्री उत्साहात संपन्न झाला. 

सारा डी फेजमधील महिला भगिनींनी स्वखर्चातून सोसायटीमध्ये शंकर महादेवाचे मंदिर उभारून एक भव्यदिव्य असा महाशिवरात्रीचा वेद पठण कार्यक्रम ठेऊन महाशिवरात्री उत्सव उत्साहात संपन्न झाला.

सोसायटीमधील महिला भगिनी यांनी एकत्रित येऊन दैदिप्यमान उत्सव आयोजित केला त्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन संगीता मोरे, रागिणी गायकवाड, सुनंदा चव्हाण, सुनीता पाचवे, लक्ष्मी शितोळे, छमा यादव, पल्लवी देशमुख, अश्विनी पाटोळे, शिला साबळे यांच्यासह सोसायटीतील महिला भगिनीनी या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते.

या मंदिरासाठी बाळासाहेब साबळे यांच्यासह दत्तात्रय चव्हाण, सोमनाथ पाटोळे, राजू मोरे, राम गायकवाड आदिचे. मोलाचे सहकार्य लाभले.