महाळुंगे इंगळे गावातील बेकायदेशीर प्लॉटिंगच्या फसवणूकी बाबत प्लॉटिंग विक्रेत्याचा खुलासा...!

महाळुंगे इंगळे गावातील बेकायदेशीर प्लॉटिंगच्या फसवणूकी बाबत प्लॉटिंग विक्रेत्याचा खुलासा...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : महाळुंगे इंगळे गावातील गट नंबर ५४ मधील खरेदी विक्री व्यवहारातील प्लॉट विक्रेते अनिकेत केदारी यांनी ६० वर्षिय महिलेला विकलेल्या प्लॉटिंगच्या व्यवहारचा News15 मराठीकडे खुलासा केला आहे.

महाळुंगे इंगळे गावातील व्यवहारात महिला व अनिकेत केदारी यांच्या व्यवहारात फक्त चतु : सिमा आणि व्यवहारिक देवाण घेवाण यातील नगण्य तडजोडी होतं नसल्याने समाज माध्यमातून काही चुकीचे गैरसमज पसरवले जात आहे. त्याच अनुषंगाने माध्यमातून बातमी प्रसारित करण्यात आली होती. सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून किरकोळ विषयातून काही चुकीच्या गैरसमजातून झालेल्या घटनावर पडदा पडून प्रकरण मिटविण्याची दोन्ही बाजूनी भूमिका घेतल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे मध्यस्थीच्या माध्यमातून हा विषय माझ्याकडून संपला असल्याचा खुलासा प्लॉट विक्रेता अनिकेत केदारी यांनी केला आहे.

सध्या प्लॉटवरील उताऱ्यावर महिलेचे नाव असून फक्त प्लॉट संदर्भात फक्त कागदपत्राचा गुंता सोडवून त्या महिलेचा व्यवहार पूर्ण करून आणि अनिकेत केदारी यांच्यातील मध्यस्थी यशस्वी झाल्याचा निर्वाळा अनिकेत केदारी यांनी News15 मराठी वाहिणीकडे केला आहे.

प्लॉट विक्रेता आणि घेणारी महिला यांच्यातील कागदपत्रे पडताळणीनंतर यांच्यात रीतसर खरेदीखत झाले आहे. त्याच्या अनुषंगाने प्लॉट घेणाऱ्या महिलेचे नाव सातबारा दप्तरी नोंदवले आहे. यामुळे सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केली असता व्यवहार पूर्णतःवास गेला आहे असा खुलासा अनिकेत केदारी यांनी दिला आहे.