मोठी बातमी : बेकायदेशीर प्लॉटिंग विक्रेत्याचा प्रताप, एक प्लॉट दोन लोकांना विकला, वृद्ध महिलेची फसवणूक..!

मोठी बातमी : बेकायदेशीर प्लॉटिंग विक्रेत्याचा प्रताप, एक प्लॉट दोन लोकांना विकला, वृद्ध महिलेची फसवणूक..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

चाकण : महाळुंगे इंगळे गावातील वाय कॉर्नर येथील गट नंबर ५४ मधील क्षेत्रात एका महाभाग प्लॉटिंग विक्रेत्याने एकच प्लॉट दोन व्यक्तींना विकून एका वृद्ध महिलेची तब्बल ३० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायला घटना समोर आली आहे.

मागील काही दिवसापासून अशा बेकायदेशीर प्लॉटिंग धारक मोठ्या आर्थिक रकमेच्या लोभापाई एकच प्लॉट दोन जणांना विकून काही गरीब सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर येऊ लागले आहे. यातच महाळुंगे इंगळे गावात अनिकेत केदारी नामक बेकायदेशीर प्लॉटिंग करणाऱ्या महाभागाने एका ६० वर्षीय विधवा महिलेला प्रथम १ गुंठा ऐवजी दबाव टाकून २ गुंठे प्लॉट घ्यायला लावला. त्यानंतर त्या महिलेने मध्यस्थीच्या माध्यमातून दोन गुंठ्याचे पैसेही दिले. त्यानंतर महिलेने अगोदर मला माझा प्लॉट कोणता आहे हे दाखवा असा तगादा लावला. यावर प्लॉटिंग विक्रेता अनिकेत केदारी व त्याचा सहकारी याने त्यांना प्लॉटही दाखवला तुमचे सातबाऱ्यावर नाव आले आहे हा प्लॉट तुमचा आहे असे सांगितले. पण भामटा असणाऱ्या अनिकेत केदारी या प्लॉटिंग विक्रेत्याने महिलेची फसवणूक करून तोच प्लॉट दुसऱ्या व्यक्तीला परस्पर विकला. आणि आता ती महिला त्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी गेली असता तिथं दुसऱ्या व्यक्तीला पाठवून ही जागा माझी आहे इथे काम करायचे नाही अशी दमबाजी करण्यास सुरुवात केली. 

एवढेच काय तर या प्लॉटिंग विक्रेत्याने त्या महिलेचे सर्वात अगोदर खरेदीखत करून घेतले होते. त्या महिले बरोबर इतरही पाच ते सहा लोकांनी खरेदी खत केले होते त्यांना प्लॉट गट नंबर ५४ मध्येच दिले आहेत. पण या महाभाग प्लॉटिंग विक्रेत्याने याच महिलेची फसवणूक करण्यासाठी त्या महिलेला कोणतेही संमती पत्र करून दिले नाही आणि त्यात चतु:सिमा या चुकीच्या दाखवल्या आहेत. पण त्याचं महिलेच्या शेजारील बाजूच्या प्लॉटच्या कागदपत्रातील चतु:सीमेत पश्चिमेला याच महिलेच्या नावाचा उल्लेख असल्याने या महाभाग प्लॉटिंग विक्रेत्याने गोलमाल करून महिलेची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.

आता याच प्रकरणानंतर महिलेने महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात या महाभाग प्लॉटींग विक्रेता अनिकेत केदारी यांच्या विरोधात रीतसर लेखी तक्रार दिली आहे. त्यावरही महाळुंगे MIDC पोलीस काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे. या महाभाग प्लॉटिंग विक्रेत्याने या अगोदरही असेच चुकीचे गोरस धंदे केले असल्याची चर्चा चाकण परिसरात सुरु आहे. अशा अनाधिकृत प्लॉटिंग करणाऱ्या अनिकेत केदारी नामक प्लॉटिंग विक्रेत्याचे चाकण औद्योगिक परिसरात बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर प्लॉटिंग विक्री सुरु आहे. या संदर्भात आता PMRDA कडे रीतसर तक्रार करून अशा सर्वसामान्य नागरिकांना फसवणाऱ्या प्लॉटिंग विक्रेत्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होऊन अशा चुकीच्या प्लॉटिंग विक्रेत्याकडून बेकायदेशीर प्लॉटिंग न घेता रीतसर सर्व कागपत्रांची पडताळणी करूनच जमीन खरेदी विक्री व्यवहार करण्यात यावेत नाहीतर अशा महाभाग प्लॉटिंग विक्रेत्यांकडून फक्त आर्थिक लोभापाई एखाद्याचे कुटुंब उद्धवस्त करण्याचा घाट घातला जात असल्याचे समोर आले आहे. आता तरी या अनिकेत केदारी याला देव सद्बुद्धी देवो नाहीतर अशा व्यावसायिकांचा अस्त व्हायला वेळ लागणार नाही.