दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने रोहिदास महाराज जयंती साजरी...!

दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने रोहिदास महाराज जयंती साजरी...!

News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण 

नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीच्यावतीने संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक निकम यांच्या हस्ते संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निकम यांनी संत रोहिदास महाराजांच्या कार्याची माहिती आपल्या मनोगतातुन व्यक्त केली.

यावेळी दिलीप निकम, सचिन वेताळ,अभिजित राऊत,नगरपंचायतीचे राजेंद्र खिरकाडे,अमोल मवाळ,बाळु निसाळ आदी उपस्थित होते.