सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भितकर यांचा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान...
![सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भितकर यांचा, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान...](https://news15marathi.com/uploads/images/202302/image_750x_63e469c90de98.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : किरण मुक्कावार
यवतमाळ : सामाजिक क्षेत्रामध्ये महिला सबलीकरण, रोजगार निर्मिती व कौशल्यावर आधारित कार्य करत असल्याची दखल घेत; महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भितकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.
ग्रामीण व शहरी विभागातील महिला व युवतीला गेल्या 17 वर्षांपासून 16 हजार महिलांना आज पर्यंत प्रशिक्षण देऊन, त्यांना शासनाच्या विविध योजना अंतर्गत माहिती व प्रशिक्षण देण्याचे कार्य करतात व आज सुद्धा सुरू आहे. आदिवासी, पारधी अशा विविध समाजातील महिलांना महिला सबलीकरण अंतर्गत स्वयंरोजगार मार्गदर्शन केले आहे. सुनीता भितकर या महिलांना निशुल्क प्रशिक्षण देऊन महिलांना ट्रेनिंग देण्याचे कार्य करतात. शेतकरी, आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना रोजगार निर्मिती, कौशल विकास यांच्यासोबत विविध क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना लघुउद्योजक घडविण्याचे कार्य अविरत करीत आहे.
त्यांच्या याच कार्याची दखल घेत; महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते मुंबई येथे सामाजिक कार्यकर्त्या सुनिता भितकर यांचा सन्मान करण्यात आला आहे.