म्हाळुंगे पोलिस स्टेशनच्या पीएसआय संगीता भंडरवाड व ग्रामसुरक्षा दलाचे निकेश गिरासे यांच्याकडून किन्नर लोकांना किराणा वाटप..
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील चाकण : आज म्हाळुंगे पोलीस चौकीचे पीएसआय सौ. संगीता भंडरवाड व ग्राम सुरक्षा दलाचे निकेश गिरासे यांनी चाकण परिसरातील किन्नर लोकांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. पोलीस व ग्रामसुरक्षा कर्मचारी हे कोरोंना व्हायरसचा काळात अहोरात्र काम करत असताना. समाज्याचे आपण काही तरी देणे लागतो या उक्ती प्रमाणे त्यांनी आज किन्नर लोकांना किराणा वाटप करून ते ही एक समाजातील घटक आहेत आणि त्यानाही पोट आहे हे या उपक्रमातून दाखवून देण्याचा प्रयत्न पीएसआय सौ. संगीता भंडरवाड व निकेश गिरासे यांनी दाखवून दिले आहे.