शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा
![शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा हदगाव तहसील कार्यालयावर धडकला मोर्चा](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66df26647f888.jpg)
प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान हे हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात झाले. शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट 50 हजार रुपय आर्थिक मदत करावी, जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी.! यासह शेतकऱ्यांच्या इतर मागण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली हदगाव येथे मोर्चा काढण्यात आला.
हदगाव शहरातील जुने तहसिल ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.