मनोज जरांगे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कळस बुद्रुकच्या सुपुत्राकडून अन्नत्याग आंदोलन...!

मनोज जरांगे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कळस बुद्रुकच्या सुपुत्राकडून अन्नत्याग आंदोलन...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील

अकोले : मराठा सामाज्याला आरक्षण मिळावे यासाठी जालना जिल्ह्यातील मराठा सुपुत्र मनोज जरांगे पाटील अन्नत्याग आमरण उपोषण सुरु केले आहे. त्याच आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक गावचे सुपुत्र शांताराम माधव वाकचौरे यांनीही अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.

जर आपल्या मराठा सामाज्याला आरक्षण भेटत नसेल आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा सारखा मराठी योद्धा अन्नत्याग आंदोलन करत आहे तर, अशा जातीसाठी लढणाऱ्या व्यक्तीला मीही माझ्या परीने शक्य होईल तितक्या दिवस अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे अशी प्रतिक्रिया शांताराम वाकचौरे यांनी दिली आहे.

मराठा सामाज्याची मुलं चांगले गुण मिळवूनही नोकरींपासून वंचित राहत आहेत. हे मराठा समाज्याच्या भविष्यातील पिढ्यासाठी खूप घातक आहे. एक मुलगा नोकरीं पासून वंचित राहिला तर एक संपूर्ण पिढी रसातळाला जाते. त्यासाठी अभि नही तो कभी नहीं या उक्तीप्रमाणे मराठा समाज जो आरक्षणासाठी एकत्र आला आहे त्या सामाज्याला माझा अन्नत्याग करून पाठिंबा असल्याचे शांताराम वाकचौरे यांनी सांगितले.

शांताराम माधव वाकचौरे यांनी मराठा समाज्याच्या आरक्षणासाठी अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अन्नत्याग आंदोलनास कळस बुद्रुक गावातील ग्रामस्थ, भजनी मंडळ, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, इतर गावानतील नागरिकांनीही जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

आंदोलन शांताराम वाकचौरे यांचे वजन घटण्यास सुरुवात झाली आहे तर, शरीरातील साखरेचे प्रमाणही कमी झाल्याने त्यांच्या तब्बेती बाबत कळस बुद्रुक ग्रामस्थ चिंता व्यक्त करत आहेत. पण एवढे अन्नत्याग आंदोलन करूनही अजून प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याचे कळस बुद्रुक ग्रामस्थांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी विनंती करूनही शांताराम वाकचौरे आपल्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याने व तिकडे मनोज जरांगे पाटिलही आंदोलनावर ठाम असल्याने सरकारने परिस्थिती बिघडण्याच्या आत आरक्षणावर निर्णय घेण्याची मागणी कळस बुद्रुक ग्रामस्थ करत आहेत.