शेतकऱ्यांना 2023 च्या खरिब हागामातील पीक विमा सरसकट मिळण्यासाठी तहसीलदार व कृषी आधिकारी कार्यालयावर धडकला मार्चा...

शेतकऱ्यांना 2023 च्या खरिब हागामातील पीक विमा सरसकट मिळण्यासाठी तहसीलदार व कृषी आधिकारी कार्यालयावर धडकला मार्चा...

प्रतिनिधी - मनोज मनपुर्वे, नांदेड

नांदेड अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, उडीद, तूर अशा पिकांना सरसकट अनुदान देण्याच्या मागणीसाठी; तालुक्यातील शेतकरी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यानी तहसीलदार कार्यालय आणि कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात घोषणाबाजी देत घेतला घेराव व निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांनी  खरीप पिकाची ऑनलाईन नोंदणी केली. परंतु, ऑनलाईन करून सुद्धा महसूल प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये नावाचा समावेश झालेला नाही. तरी शेतकऱ्यांनी असे लक्षात येताच खरिपाची पिकाची ऑनलाईन नोंद न करता त्याची नोंदणी  झाली आहे. नोंदणी नसताना सुद्धा त्याचे नाव सामील झाले असून, काही शेतकऱ्याला ऑनलाइन करून सुद्धा पिक विमा मिळाला नसल्या संदर्भात शेतकऱ्याने पिक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी या मागणीसाठी तहसीलदार व कृषी अधिकारी कार्यालय येथे घोषणाबाजी देत निवेदन देण्यात आले.

त्यांच्या नावाने कागदपत्रे असून सुद्धा; शेतकऱ्यांना अनुदान मिळत नाही. आम्हा शेतकऱ्याला न्याय न मिळाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असाही इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील शेतकरी बाधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्ता नादरे, उध्दवराव राजगोरे, संजय गोवंदे, सजंय मुगल, आनंदा ईगोले, गगाधर कल्याणकर, माणिका मुगल याच्यासह आदि शेतकरी बाधव उपस्थित होते.