अजित दादांनी केली चूक मान्य.! राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं...
![अजित दादांनी केली चूक मान्य.! राजकारण घरामध्ये शिरू द्यायचं नसतं...](https://news15marathi.com/uploads/images/202408/image_750x_66bb3102b235b.jpg)
NEWS15MARATHI रिपोर्ट...
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केल्याने, पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारण हे पार घरामध्ये शिरू द्यायचं नसतं.! माझं मात्र... माझ्याकडून थोडीशी चूक झाली. त्या काळात मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं; पण त्यावेळी केलं गेलं... पार्लालमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला.! परंतु, आता जे झालं, एकदा बांध सुटल्यानंतर आपण काही करू शकत नाही... पण आज माझं मन मला सांगत तसं व्हायला नको होतं... असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
यावरून आता उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते दादांचं मन परिवर्तन होत असल्याचे चिन्ह दिसत असून, तसे त्यांनी मत व्यक्त केले आहे.