वाकचौरे नेता घामाचा, लोखंडे नाही कामाचा, शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार वाकचौरे यांचीच सरशी...!

वाकचौरे नेता घामाचा, लोखंडे नाही कामाचा, शिर्डी लोकसभा मतदारसंघात माजी खासदार वाकचौरे यांचीच सरशी...!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

अकोले : शिर्डी लोकसभा मतदारसंघात सध्या महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही त्या उलट महाविकास आघाडीने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी जाहीर करून पुन्हा लोकसभा मतदातसंघात घामाचा माणूस दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्या उलट विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे काही नाही कामाचा अशी बोलकी प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदार बोलून दाखवत आहेत.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा २००९ ते २०१४ चा खासदारकीचा कार्यकाळ बघता शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदार काय काम करतो हे त्यांनी गावोगावी सभामंडप देऊन दाखवून दिले. तर या उलट विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या २०१४ ते २०२४ असा दहा वर्षाचा कार्यकाळ बघितला तर, हा खासदार नाही कामाचा अशीच काहीशी प्रतिक्रिया सर्वसामान्य मतदार बोलून दाखवत आहेत.

या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वाकचौरे नेता घामाचा, लोखंडे नाही कामाचा अशी नवी टॅग लाईन घेऊन महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांनी विद्यमान खासदाराला घरचा रस्ता दाखविण्याचा चंग बांधला असल्याचे दिसून येतं आहे. माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात शिर्डी लोकसभा मतदारसंघात गावागावात गावातील सामुदायिक कार्यक्रमासाठी सभामंडप स्वतःच्या खासदार निधीतून उभे केले. त्याचं बरोबर शिर्डीच्या साईबाबा संस्थांनच्या कंत्राटी कर्मचारी यांचा बऱ्याच वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला. छोट्या गांवानी पथदिवे, रस्ते यांचे वितरण केले. निळवंडे धरणाच्या कालव्याचा विषय लोकसभेत अतिशय अभ्यासपूर्ण मांडून कालव्याच्या कामांना गती दिली. असे एक ना अनेक आठवणीतील कामे भाऊसाहेब वाकचौरे यांनी त्यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात केली आहेत. शिर्डी लोकसभा मतदार संघात कुणाचं सुख असूदेत की दुःखत प्रसंग सदैव सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला लोकप्रतिनिधी म्हणून वाकचौरे यांचे नाव घेतले जाते.

त्या तुलनेत विद्यमान खासदार यांनी कुणाचा सुखाचा प्रसंग सोडा कुणाच्या दुःखातही कधी सहभागी झाल्याचे दिसले नाही. त्यांनी १० वर्षात जी काही लोकसभेत भाषणे केली असतील ती जर बघितली तर ते नक्की लोकसभेत काय मांडतात हाच प्रश्न सभागृहातील इतर खासदार व मतदारसंघातील नागरिकांना पडला आहे. २ वेळा आमदारकी, २ वेळा फुकटची खासदारकी मिळवलेल्या व्यक्तीला ज्यासाठी आपण सभागृहात बसलो आहोत हेच जर समजले नसेल तर, खरंच पुन्हा अशा लोकप्रतिनिधी यांना जनतेने निवडून द्यावे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. 

सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीत ही जागा शिंदे शिवसेनेला सुटते की नाही यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिर्डी लोकसभेची जागा जर शिंदे शिवसेनेला सुटली आणि त्यांचा उमेदवार सदाशिव लोखंडे हेच असले तर त्यांनी आजच समजून चला की, २०२४ चा लोकसभेचा खासदार उद्धव ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे हेच असतील. कारण निवडणुका आल्यावर तुम्ही जनतेच्या प्रश्नावर पत्रकार परिषदा घेऊन मी हे केले, मी ते करणार आहे अशी भाषणे ठोकायची आणि मला मतदान करा मला अजून विकास करायचा आहे अशी आश्वासने देऊन जनतेला उल्लू बनविण्याइतपत जनता आता मूर्ख राहिली नाही. तुम्हाला तुमचे राजकीय भवितव्य ठरविण्यासाठी जर तुम्हाला मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेता आले नाही तर, आज तुम्हाला जनतेकडे मत मागण्याचा अधिकार उरत नाही अशीच काहीशी परिस्थिती खासदार सदाशिव लोखंडे यांची शिर्डी लोकसभा मतदारसंघात झाली आहे. आता शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार सदाशिव लोखंडे उमेदवार असतील तर खरंच त्यांच्या झोळीत मतदार मतांचा जोगवा टाकतील? की, कृतिशील, विकासात्मक उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना प्रचंड मतांनी विजयी करतील हेच पहावे लागेल.