तिरोडा शहर काँग्रेस अध्यक्ष पवन मोरे यांच्या प्रयत्नांना यश...!

तिरोडा शहर काँग्रेस अध्यक्ष पवन मोरे यांच्या प्रयत्नांना यश...!

News15 मराठी प्रतिनिधी साहिल रामटेके 

गोंदिया: तिरोडा तालुक्यातील सेजगाव आणि लागातच्या ८,९ गावातून जात असलेल्या गॅस पाईप शेतकऱ्याच्या शेतातून जात असून कोणताही मोबदला न देता पाईप टाकण्याचे काम गेल कंपनीने सुरवात केली आहे. गावातील शेतकऱ्यांनी ही माहिती बबलू रहांगडाले यांना माहित होताच त्यांनी पवन मोरे यांना सांगितली पवन मोरे हे सेजगावच्या शेतकऱ्याच्या मदतीला धावून गेले. कंपनीच्या विरोधात पवन मोरे आणि बबलू रहांगडाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचे ठरले. ही माहिती मिळताच गेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे कान टवकारले.

पवन मोरे,बबलू रहांगडाले आणि संपूर्ण सेजगाव चे शेतकरी तहसीलदार तिरोडा कोकुडे यांना निवेदन देण्याकरिता गेले असता तहसीलदार साहेबांनी गेल कंपनीच्या प्रतिनिधी गेडाम आणि तूरकर यांना बोलावून शेतकऱ्यांयात आणि गेल कंपनीच्या प्रतिनिधी यांच्यात सामंजस्या बसवण्याचे प्रयत्न केले. या बैठकीत निर्णय घेण्यात आले की जो पर्यंत शेतकऱ्याचा मोबदला गावातल्या पंचायत मध्ये गावाकऱ्याशी चर्चा करून त्याची नुकसान भरपाई ठरत नही तो पर्यंत काम बांध ठेवावे असे निर्णय तिरोडा तहसीलदार यांनी घेतला आहे.

तिरोडा शहर काँग्रेस अध्यक्ष पवन मोरे आणि बबलू रहांगडाले यांनी मांडलेल्या मुद्देसूद विषयावर यांना यश मिळाले.