राजकीय : नाणेकरवाडी -महाळुंगे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार संदीप सोमवंशी यांची उमेदवारी बाबतची भूमिका गावातील ग्रामस्थांच्या समोर स्पष्ट...!
News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : नाणेकरवाडी -महाळुंगे जिल्हा परिषद गटातील सर्वपक्षीय आघाडीकडून इच्छुक असणारे उमेदवार संदीप सोमवंशी यांनी गावातील काकडा काल्याच्या निमित्ताने हनुमान मंदिरात एकत्रित जमलेल्या ग्रामस्थांच्या समोर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली.
यावेळी संदीप सोमवंशी यांनी बोलताना सांगितले कि, गावातून जिल्हा परिषद निवडणूकिसाठी गावातून एकच उमेदवार देऊन पक्षीय तिकीटावर निवडणूक लढवावी. संदीप सोमवंशी यावेळी बोलताना म्हणाले कि, मी सर्वपक्षीय आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मला सर्व पक्षीय आघाडीने संधी दिली तर गावाने मला एकमुखाने सहकार्य करावे. मी अपक्ष निवडणूक लढणार नाही. गावातून दुसरेही उमेदवार निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. ज्या उमेदवाराला पक्षाचे तिकीट मिळेल त्याला गावकीचा पाठिंबा असेल अशी गावकऱ्यांची भावना आहे. खराबवाडी गावातील ग्रामस्थांचा कल बघता गावातील ग्रामस्थांनी अपक्ष उमेदवारीस विरोध दर्शवल्याचे दिसून आले.
यामुळे नाणेकरवाडी -महाळुंगे जिल्हा परिषद गटातून खराबवाडी गावातील इच्छुक उमेदवार यांना कोणत्याही परिस्थितीत नावाजलेल्या पक्षाचे किंवा सर्व पक्षीय आघाडीचे तिकीट घेऊन निवडणूकीला सामोरे जावे लागणार आहे. नाहीतर ज्या उमेदवाराला पक्षीय तिकीट भेटेल त्याचेच खराबवाडी ग्रामस्थ काम करतील यात तिळमात्र शंका नाही. यावर आता कोणता इच्छुक उमेदवार कोणती राजकीय सूत्र जुळवतात हेच पहावें लागेल.