आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबीर व वृक्षारोपण...
![आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मार्गदर्शन शिबीर व वृक्षारोपण...](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_6493f91486a35.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी
लातूर : शिरूर अनंतपाळ शहरात माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने; वृक्षरोपण तसेच 10 वी, 12 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, विद्यार्थांना वसंत हंकारे यांचे मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले आहे.
यावेळी नगराध्यक्षा मायावती धुमाळे , उपजिल्हाधिकारी शोभा जाधव , तहसीलदार काशीनाथ पाटील , गटविकास अधिकारी बी टी चव्हाण , तालुकाध्यक्ष मंगेश पाटील , अॅड जयश्री पाटील , यांच्यासह तालुक्यातील विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थी, पालक मुख्याध्यापक , विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .