बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी...
![बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी...](https://news15marathi.com/uploads/images/202306/image_750x_6493d7da60877.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक - दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथे; बिबट्याने एका 9 वर्षीय बलिकेवर हल्ला केला असून, त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कु. अश्विनी लहू पवार (वय ९) दि.२१ जून रोजी 5 च्या सुमारास सायंकाळी घरून गावाकडे येत असताना; वाहाळातुन अचानक येऊन बिबट्याने अश्विनीवर हल्ला केला. तिच्या मानेलाच बिबट्याने पकडले. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिने आरडाओरडा करताच बिबट्याने धूम ठोकली. आजूबाजूचे शेतकरी धावून आल्यानंतर तिला दिंडोरी रुग्णालयात दाखल केले असता डॉ. काळे यांनी प्राथमिक उपचार केले आणि मानेवर जखमा असल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी ही परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा बळी गेला आहे.त्याचबरोबर बिबट्याचे वास्तव्य गेल्या अनेक वर्षांपासून असल्याने बिबट्याची पैदासही मोठ्या प्रमाणात आहे. नरभक्ष बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी,ग्रामस्थांनी, व मजूर वर्गाने,केली आहे.